अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मोठं मंदिर उभारलं जात आहे. या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे. पण मंदिराचं पूर्ण बांधकाम अद्याप झालेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. विशेष म्हणजे हिंदू धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरु शंकाराचार्य यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाही, असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांनादेखील चांगलंच फटकारलं आहे. मंदिराचं काम पूर्ण झालेलं नसताना तिथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली तर मूर्तीमध्ये भूत, प्रेत सामावण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. शकराचार्यांनीदेखील याबाबत भाष्य केलं. पण एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी राजकीय नेत्यांना फटकारलं. त्यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी शंकराचाऱ्यांवर टीका केली.