राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्यामुळे पंकजा मुंडे यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघातून विस्थापित होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं असून त्याची चर्चा सुरू झाली आहे.
पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे, असा सवाल नाना पटोले यांना विचारण्यात आला. त्यावर स्वागत आहे. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील तर स्वागत आहे. सोनिया गांधींशी त्यांची चर्चा झाली असेल तर चांगली गोष्ट आहे, असं नाना पटोले म्हणाले.