Tuesday, April 29, 2025

भाजप नेत्या पंकजा मुंडे लोकसभा लढणार? भाजप नेत्यांचं मोठं विधान

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत पाच पैकी तीन राज्यात भाजपचा दणदणीत विजय झाला. यानंतर आता भाजपने लोकसभा निवडणुकीकरता कंबर कसली आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे येणारी लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मोठं भाष्य केले आहे. पंकजा मुंडे लोकसभा लढणार असतील तर आनंदच आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? याचा निर्णय वरिष्ठ घेतील असं वक्तव्यही प्रवीण दरेकर यांनी केले आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, पंकजाताई आमच्या मोठ्या नेत्या, त्यांना लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरवलं तर आनंदाचं होईल. पण त्याचा निर्णय आमचे नेते घेतील. तो माझा विषय नाही. भाजप सर्वे करुन लोकसभेचं तिकीट देत असतात. जे नेते पॅाप्युलर आहे, निवडून येण्याची क्षमता आहे. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळत असते आणि वरिष्ठ नेते यासंदर्भातील निर्णय घेतील, असेही त्यांनी म्हटले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles