Sunday, March 16, 2025

भाजप करणार पंकजा मुंडेंचे पुनर्वसन…राज्यसभेवर पाठविण्याच्या हालचाली.

मुंबई: बीड लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याचे कळते. दिल्लीत नुकतीच भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे कमालीचे निराश आणि नाउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles