Saturday, May 25, 2024

तीन महिन्यांपूर्वी ठाकरेंचा भाजपबरोबर येण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंनी घेतली होती अमित शहांची भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेची लालसा कालही होती आणि आजही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा शब्द कधीही खाली पडू दिला नाही. तीन महिन्यांपूर्वीही ठाकरेंनी भाजपसोबत येण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता आमची दारे कायमची बंद झाली आहेत, अशा शब्दांत भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोमवारी टीका केली.

आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर अडीच महिने अदित्य ठाकरे गायब होते याकडे लाड यांनी लक्ष वेधले. सध्या महानायकाविरोधात महानालायक अशी राजकीय परिस्थिती आहे. ज्या अदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी अंगा-खांद्यावर खेळवले, सरकार सत्ता पक्ष, व्यवस्था दाखवली. अशा व्यक्तीची राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना जीभ अडखळली कशी नाही, असा प्रश्न लाड यांनी केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles