Home नगर जिल्हा झाकीर नाईक देणगी प्रकरण..राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले….

झाकीर नाईक देणगी प्रकरण..राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले….

0
25

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडीकडून मुंबईत सुरु असलेल्या कारवाईवरुन सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला भारतातील वादग्रस्त धर्मगुरु आणि देशद्रोहाचा आरोप असलेला झाकीर नाईकने साडेचार कोटी रुपये दिले, असा मोठा दावा केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. संजय राऊत यांच्या या दाव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. झाकीर नाईकने संस्थेला अडीच कोटी रुपये दिले होते, अशी कबुली विखे पाटलांनी दिली. पण झाकीर नाईकने 10 ते 15 वर्षांपूर्वी पैसे दिले होते. तसेच त्याची चौकशीदेखील झाली होती, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.