Wednesday, April 30, 2025

1 सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक, 3 सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट, दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?

अंतरवली सराटीमध्ये सप्टेंबर महिन्यात दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या आंदोलनाच्या पाठीमागे कोण आहे? अशा अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी दगडफेक प्रकरणात अटक झालेला ऋषीकेश बेदरे आणि शरद पवारांचा एक फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो ट्वीट करताना दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? असा सवाल देला आहे.

ऋषीकेश बेदरेला अंतरवाली सराटी गावात झालेल्या दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांचं उपोषण सुरु असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जमध्ये अनेक मराठा आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले होते. पण या लाठीचार्जबद्दल दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. जालन्यात पोलिसांनीच आमच्यावर हल्ला केला असा आरोप जरांगे पाटील करत आहेत. तर आंदोलकांनीच पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप दुसऱ्या बाजूकडून करण्यात येत आहे. याच प्रकरणात आता ऋषिकेश बेदरेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बेदरेच्या घरातून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत.

दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? पवार साहेब, पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. नितेश राणेंनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये दगडफेकीतील मुख्य आरोपी हृषीकेश बेदरे, शरद पवार, राजेश टोपे आहे. नितेश राणे म्हणाले, 1 सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर तीन सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?

https://x.com/NiteshNRane/status/1728617689277661301?s=20

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles