Wednesday, April 17, 2024

‘अरे नटरंगी नाच्या महाराष्ट्र, देशातील जनता तुला चपलेने मारल्याशिवाय गप्प राहणार नाही

खासदार संजय राऊत आज पत्रकारांशी संवाद साधताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी केली आहे. राऊतांच्या या टीकेवर भाजपने आता आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय. नरेंद्र मोदी हे देशातील 130 कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत नावाचा नाच्याला हे माहीत नाही. सकाळी उठून लिपस्टीक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोललं जातंय. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला जातोय, असे प्रसाद लाड म्हणाले. तसेच संजय राऊत यांना उद्देशून ‘अरे नटरंगी नाच्या महाराष्ट्र, देशातील जनता तुला चपलेने मारल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही,’ असं प्रसाद लाड म्हणालेत. तसंच संजयजी तुम्ही अशा प्रकारचं हीन कृत्य परत केलं, तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संज्या तुला संगतो तुला मी सोडणार नाही, असा इशाराही प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles