राज्यात महायुतीचे सरकार आहे. भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सरकारमध्ये आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार याच्या दादागिरीचे किस्से अधूनमधून समोर येत असतात. परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजप आमदाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजप आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यास मारहण केल्याची घटना घडली. पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रमात हा प्रकार घडला. या कार्यक्रमास अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते.
भाजप आमदार सुनील कांबळे यांची दादागिरी शुक्रवारी पुन्हा एकदा समोर आली. ससून रुग्णालयाच्या कोनशिलेवर आपले नाव नाही यामुळे कांबळे यांना राग आला. त्यांनी आपला संताप व्यासपीठावरुन खाली उतरताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर काढला. राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांनी त्यांनी मारहाण केली. तसेच यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यास त्यांनी मारहाण केली. ज्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली त्याची माहिती मिळाली आहे. हा कार्यक्रम ससून रुग्णालयाच्या प्रशासनाकडून कार्यक्रम ठेवला होता.
भाजप आमदाराची ‘अजितदादा’समोर ‘भाई’गिरी: NCP पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली
- Advertisement -