राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची जोरदार चर्चा राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शक्यता भाजपाच्या एका खासदाराने वर्तवली आहे!
भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामींनी केलेल्या एका ट्वीटची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या कानावर ही बाब पडल्याचे स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
स्वामींनी ट्वीटमध्ये राष्ट्रवादी शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येणार असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे. ” स्वामी म्हणाले मी मुंबईत आहे. शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात. कारण मोदींनी आधी त्यांचा वापर करून घेतला. नंतर त्यांना बाजूला सारून आता राष्ट्रवादी काँग्रेसला चुचकारण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीमुळे ते अस्वस्थ झाले आहे, असे मी ऐकले” सुब्रह्मण्यम स्वामींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले.