भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांनी पुढील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांनी याबाबत एक्सद्वारे माहिती दिली आहे.
एक्सवर पोस्ट करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने मला हा आठवडा treatment घ्यावी लागेल .. माझे सर्व कार्यक्रम पुढे ढकलत आहे … प्रवास करण्याची परवानगी नाही..” दुखापतीची माहिती देताच त्यांच्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट्स आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी यापुढे काळजी घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.