राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीला ओबीसी बांधवांचा विरोध असून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. यां संदर्भात राज्यातील भाजप ओबीसी सेलची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन ओबीसी बांधवही आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भाजप ओबीसी सेलची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ओबीसी समाजातील बडे नेते उपस्थित होते.
या बैठकीत ओबीसी ओबीसी योजनांतील अटी व शर्थी शिथिल करण्याबद्दल निर्णय झाल्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी सांगितले आहे. तसेच या बैठकीमध्ये ओबीसी समाजासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना तळागाळात राबवण्याबद्दल निर्णय झाला.
तसेच प्रत्येक विधानसभेत १ हजार विश्वकर्मा लाभार्थी तयार करणार येणाऱ्याचा निर्णयही या बैठकीत झाला. या योजनेअंतर्गत राज्यात ३ लाख लाभार्थी तयार करणार येणार असून प्रत्येक लाभार्थ्याला १ ते ३ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देणार मिळणार आहे. तसेच या योजनेतून तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी वाटण्याचे भाजपचे नियोजन आहे. पुढील एका महिन्यात ही योजना राबवण्यात येणार आहे.