लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील तिसऱ्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभेवर पंकजांचं राजकीय पुनर्वसन करुन त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतलं जाण्याचे संकेत मिळत आहेत.
पंकजा मुंडे यांना दिल्लीहून बोलावणं आलं आहे. पंकजा मुंडे सकाळीच तातडीने रवाना झाल्या. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या पियुष गोयल, उदयनराजे भोसले, नारायण राणे यासारख्या उमेदवारांच्या राज्यसभा जागा रिक्त होणार आहेत. पंकजा मुंडेंना राज्यसभा देऊन मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. एनडीएच्या बैठकीचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पंकजांबाबतीत मोठी घडामोड समोर येणं अपेक्षित आहे.