जरांगे पाटील तुम्ही परवा दरेकरांना म्हणालात घरात घुसू, पंखे तोडू. तुमच्यात हिंमत असेल तर मुंबईत या. हे सगळे उद्योग आणि धंदे बंद करा. देवेंद्र फडणवीसांचा मुका आम्ही घेऊ, पण तुम्ही शरद पवारांचा मुका घ्यायचं बंद करा. मराठा आंदोलनाचं राजकारण करुन त्याला खड्ड्यात घालण्याचं काम करु नका” असं म्हणत भाजप नेते प्रसाद लाड यांनी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिलंय. ते मुंबईत बोलत होते.
लाड म्हणाले, एखाद्या व्यक्तीमत्वाचं किंवा आंदोलनाचं सन्मान किती करायचा याची एक वेळ असते, एक सन्मान असतो. परंतु वेळोवेळी एखाद्या गोष्टीचं राजकारण करुन समाजकारणाला खड्ड्यात घालण्याचं काम मनोज जरांगे पाटील करणार असतील. देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्या, त्यांना जे करायचंय ते करा. मी बघून घेईल, असं म्हणतात. मनोज जी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आम्ही ज्या भागात लहानाचे मोठे झालो ते हे धंदे करुनच मोठे झालो, असंही प्रसाद लाड यांनी सांगितलं.