नवी दिल्ली : राज्यसभेसाठी भाजपने रविवारी १४ उमेदवारांची घोषणा केली. सदसत्वाची मुदत संपलेल्या एकाही केंद्रीय मंत्र्यांचा समावेश नाही. यामुळे लोकसभेसाठी त्यांना रिंगणात उतरवले जाण्याचे स्पष्ट संकेत आहेत. अद्याप काही उमेदवारांची घोषणा अपेक्षित आहे.
उत्तर प्रदेशातून माजी केंद्रीय मंत्री आर.पीएन.सिंह तसेच सुधांशु त्रिवेदी यांना पक्षाने उमेदवारी दिली. कर्नाटकमधून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची राज्यसभेची मुदत संपत आहे. मात्र त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्याच बरोबर माध्यम प्रमुख अनिल बलुनी यांना उत्तराखंडमधून संधी देण्यात आली नाही. दोघांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते असे सुत्रांनी स्पष्ट केले. बिहारमधील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांचेही नाव यादीत नाही. हरयाणातून माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष बरला यांना उमेदवारी दिली आहे.