भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा आ.प्रा.राम शिंदे यांच्यावर पक्षाने तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी सोपवली आहे. पक्षाने महाराष्ट्रातील निवडक आमदार, खासदारांना तेलंगणात पाठविले आहे. याअंतर्गत हैदराबाद येथे झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने रणनिती आखण्यात आली. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस संघटन बी.एल.संतोष, प्रभारी प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष किशन रेड्डी आदी उपस्थित होते.
भाजपकडून यापूर्वीही प्रा.राम शिंदे यांना गोवा विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी व नियोजनासाठी पाठविण्यात आले होते.
https://x.com/RamShindeMLA/status/1709806254070350279?s=20
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ.प्रा.राम शिंदेंवर तेलंगणात मोठी जबाबदारी
- Advertisement -