आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाविजय २०२४ संकल्प यात्रेला सुरूवात केली आहे. यात्रेच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबाग मधील नागरीकांशी संवाद साधला. डीजे ढोल ताश्यांच्या गजरात भाजपची महाविजय संकल्प यात्रा २०२४ बुधवारी अलिबागमध्ये दाखल झाली होती. बाजारपेठ परीसरात जाऊन दुकानदार आणि ग्राहकांशी त्यांनी संवाद साधला. पंतप्रधान पदी तम्हाला कोण पहायला आवडेल हा एकच प्रश्न ते सर्वांना विचारत होते. स्वाभाविकपणे भाजपची यात्रा असल्याने बहुतांश लोक नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन बाजूला होत होते. मात्र बाजार पेठेतील एका दुकानदाराला बावनकुळे यांनी पुन्हा पंतप्रधानपदी कोणाला बघायला आवडेल असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने, राहूल गांधी असे स्पष्ट उत्तर दिले. या उत्तरामुळे बावनकुळे यांची चांगलीच पंचाईल झाली.
https://x.com/somnathgur99445/status/1714675206571409882?s=20
पुढचा पंतप्रधान कोण ?..दुकानदाराच्या उत्तराने भाजप प्रदेशाध्यक्षांची पंचाईत
- Advertisement -