आगामी लोकसभा निवडणुकीत मिशन 45 यशस्वी करण्यासाठी भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांच्या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या दादरच्या वसंतस्मृती सभागृहात प्रशिक्षण वर्ग पार पडला. राज्यात निवडणूक यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे प्रशिक्षण देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केलं.
निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून ग्राम पातळीवर मायक्रो प्लानिंग करण्यात येत आहे.
‘आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी आली असली तरी राज्यात भाजप इज ऑलवेज बॉस, युतीमधील सर्व पक्षांमध्ये समन्वय साधत त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. पक्ष प्रथम आणि मी शेवटी आहे, इथे मी उभा आहे तो पक्षामुळेच. मी पक्ष सोडून उभा राहिलो तर माझंही डिपॉझिट जप्त होईल,’ असं फडणवीस म्हणाले.