पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपा नेते, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ‘आपल्याला पक्षाने सरपंच होण्यास सांगितले तरी आपण सरपंच होऊ’, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
“मी ३५ वर्षे आमदार, खासदार राहिलो. आता पक्षाने जर मला गावचा सरपंच होण्यास सांगितलं तर मी गावचा सरपंच होईन. कारण गावचा सरपंच झालं तर गावचा विकास तरी करता येईन”, असं रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.