भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदी विनोद तावडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात भाजपचा पक्ष विस्तारासाठी भर असल्याचे दिसत आहे. भाजपच्या वतीने आजपासून सदस्यता नोंदणी अभियान सुरू केले गेले आहे, या अभियानाच्या प्रमुखपदाची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीत तावडेंवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदी विनोद तावडे यांची निवड करण्यात आली आहे.