भाजपनं राष्ट्रवादीसोबत केलेली ही युती भाजपच्या कार्यकर्त्यांना फारशी रूचली नसल्याचं चित्र आहे. असाच एक फोन कॉल सध्या व्हायरल होत आहे. या फोन कॉलचं रेकॉर्डिंग ट्विट करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे यांनी एक फोन कॉलचं रेकॉर्डिंग ट्विट करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘दोन फुल, एक हाफ सरकारबाबत ‘मन की बात’! भक्तांनो, कानात गरम तेल घातल्यासारखे होईल.. पण ऐकाच.. बाजारात बरनॉल संपले असेल तर तेथील शिवसैनिकांना सांगा.. मिळवून देतील’. असं म्हणत त्यांनी भाजपला डिवचलं आहे.
दोन फुल, एक हाफ सरकारबाबत 'मन की बात'!
भक्तांनो, कानात गरम तेल घातल्यासारखे होईल.. पण ऐकाच.. 😊
बाजारात बरनॉल संपले असेल तर तेथील शिवसैनिकांना सांगा.. मिळवून देतील. #MaharashtraPolitics pic.twitter.com/2saWXZB3oK
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 10, 2023