राष्ट्रवादीतील बंडा नंतर शरद पवार यांची सावली बनलेले आ. रोहित पवार हे अजित पवार यांच्या बरोबर गेलेल्या नेत्यांवर टीका करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे सचिन पोटरे यांनी रोहित पवार यांना सोशल मीडियावर बोचरा प्रश्न विचारला आहे. पोटरे यांनी म्हटले आहे की,
रोहित दादा म्हणताय…अजून काय पाहिजे..?
कर्जत जामखेडचे आमदार श्री.रोहित पवार यांनी ‘अजून काय पाहिजे ?’ ही टॅगलाईन वापरून अजितदादांच्या गटात सामील झालेल्या नेत्यांना सोशल मीडियावर झोडायचे काम सुरू केलं आहे. आपण पवार साहेबांची सावली असून #आश्वासक_चेहरा म्हणून भावी मुख्यमंत्री आपणच होणार असा कदाचित यामागचा त्यांचा उद्देश असावा.
ते सगळं ठीक आहे पण ‘अजून काय पाहिजे’ ही टॅगलाईन वापरून अजितदादांवर टीका का केली नाही ?
अजितदादांचा फोटो टाकून त्यांना काय काय दिलंय ?
याची माहिती तुमच्याकडून जनतेला कळू द्या!
यावरून तुम्हीच काल सोशल मीडियावर टाकलेल्या रंग बदलू सरड्याची आठवण होते. या सगळ्या कार्यक्रमात आपलाच सरडा होऊन बसू नये म्हणजे झालं…!!!