Sunday, July 14, 2024

भाजप या खासदारांचं तिकीट कापणार? गणेशोत्सवानंतर भाजप ॲक्शन मोडवर

आगामी लोकसभा निवडणुच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोमाने तयारी सुरु केली आहे. भाजपने तर राज्यात मिशन ४५ सुरु केलं आहे. त्या दिशेने भाजपने काम करण्यास सुरुवात केली आहे. विद्यमान खासदारांच्या कामगिरीवर भाजपचं बारीक लक्ष आहे. या सर्व बाबींचा विचार करुन राज्यात लोकसभा निवणुकीत भाजपमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे.

राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे. त्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू असल्याचीही माहितकी सूत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर असताना राज्यातील खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. मुंबईतही काही जागांवर बदल होण्याची शक्यता
गणपतीनंतर भाजप अॅक्शन मोडवर येणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ऑक्टोबरमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे. भाजप प्रदेश कार्यकारणीची ३ ऑक्टोबरला मुंबईत ही बैठक पार पडणार आहे.

मिशन ४५+ च्या दृष्टीने कार्यकारिणीत चर्चा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपची वसंत स्मृती येथे ही बैठक पार पडेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles