Wednesday, June 25, 2025

तलाठी कार्यालयातील मंडळाधिकारी ५ हजारांची लाच घेताना एसिबिच्या जाळ्यात

जळगाव-पिंप्राळा तलाठी कार्यालयात ५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या मंडळाधिकाऱ्याला रंगेहात पकडले; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात ५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयात मंडळाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरूवार ६ जून रोजी दुपारी ३ वाजता रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण खंडू बाविस्कर वय-४७, रा. पिंप्राळा असे लाच घेणाऱ्या मंडळाधिकाऱ्याचे नाव आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव तालुक्यातील सावखेडा गावात राहीवाशी आहेत. सातबारा उताऱ्यावरून तक्रारदार यांचे वडिलांचे व आते भावाचे नाव कमी करून आईचे नाव लावण्यासाठी त्यांनी पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयात १६ मे रोजी अर्ज केला होता. त्यानंतर २० मे रोजी तलाठी कार्यालयात येऊन या प्रकरणाची चौकशी केली असता मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजाराची लाचेची मागणी केली.

त्यानंतर तक्रारदार यांनी २७ मे रोजी जळगाव येथील जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे कार्यालयात येवून तक्रार दिली. त्यानुसार पथकाने गुरूवारी ६ जून रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचून मंडळाधिकारी किरण बाविस्कर हे ५ हजारांची लाच घेत असतांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जळगाव शहरातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles