अहमदनगर -कल्याण रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ रविवारी पहाटे एका 19 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला. मनिषा सुभाष बेलापुरकर (रा. झारेकर गल्ली, नालेगाव) असे मयत युवतीचे नाव आहे. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नालेगाव भागात लेडी डॉन मनी नावाने परिचित असलेल्या मनिषाचा मृतदेह पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी तिला मृत घोषित केले.
तोफखाना पोलीस ठाण्याचे जिल्हा रूग्णालयात नियुक्त असलेले सहाय्यक फौजदार जठार यांच्या खबरीवरून तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मनीषा हिच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर काहींनी घातपाताची शक्यताही व्यक्त केली. मात्र, शवविच्छेदनानंतर ही शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. मयत मनीषाच्या आईचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. त्यानंतर घरगुती वादातून तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. अधिक तपास पोलीस अंमलदार भास्कर गायकवाड करत आहेत.
नगर -कल्याण रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ 19 वर्षीय युवतीचा मृतदेह , लेडी डॉन…
- Advertisement -