दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नगर शहरांमध्ये भाजपच्या कार्यालयासमोर जोरदारपणे घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते समोर आल्यामुळे एकमेकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचा प्रकार सुद्धा घडला आहे. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आज राज्यभर, देशभर सुरू झालेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नगर शहरातील भाजपाच्या कार्यासमोर आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणे निदर्शने करण्यास सुरुवात केली. आपच्या कार्यकर्त्यांना केजरीवाल जिंदाबाद च्या घोषणा दिल्या तर दुसरीकडे या ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली व त्यामुळे दोन्ही गटांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
आपच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा होऊ लागले, त्यांनी सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी केली मात्र एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा सुद्धा प्रकार या ठिकाणी घडल्यामुळे एकच खळबळ उडाली या ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.