सबसे कातिल म्हटलं की तोंडातून आपोआप गौतमी पाटील हे नाव येतं. गेल्या दोन वर्षांपासून गावागावत गौतमी पाटीलच्या अदांची अन् डान्सचीच चर्चा पाहायला मिळतेय. गौतमी पाटीलच्या डान्सचा तडका तरुणांना नेहमीच भुरळ घालत असतो.
म्हणूनच तिच्या कार्यक्रमांना नेहमीच तुफान गर्दी पाहायला मिळते. तिच्या डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या थेट गौतमी पाटीललाही टक्कर देईल, असा डान्स एका तरुणाने केलायं, ज्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ एका गावातील असल्याचे दिसत आहे. तरुणाचा डान्स पाहायला वृद्ध, तरुण, लहान मुले सर्वांनीच गर्दी केली आहे. या तरुणाने ‘तुम्हा बघून तोल माझा गेला’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तरुणाचा डान्स, त्याच्या दिलखेचक अदा अन् एकेएक स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हालं. मुलाच्या या जबरदस्त डान्सला उपस्थितांनीही जोरदार दाद दिल्याचे दिसत आहे.