प्रेमी युगुल आपल्या प्रेमात कधी काय करतील याचा काही नेम नसतो. काही तरुण-तरुणी आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीवर खरं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी त्यांचे नाव आपल्या हातवर गोंधून घेतात. काही मुलं आपल्या पत्नीचं किंवा प्रेयसीचं नाव हृदयावर देखील कोरतात. प्रेमात या गोष्टी फार छान वाटतात. कपल्सचे असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.
काही जोडपी आपल्या पार्टनरचा चेहरा देखील गोंधतात. हल्ली तर हाताच्या ठशांचा टॅटू काढण्याची सुद्धा क्रेझ आली आहे. अशात प्रेम सिद्ध करण्यासाठी एका तरुणीने कहरच केला आहे. तिने जे काही केलंय ते पाहून हसावं की रडावं असा प्रश्न तुमच्याही मनात येऊ शकतो.व्हिडिओमध्ये पाहू शकता की, तरुणीने थेट आपल्या नाजूक डोळ्यात म्हणजे बुबुळातील पांढऱ्या भागात प्रियकराचं नाव कोरलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या तरुणीने आपल्या डोळ्यामध्ये NITESH हे नाव लिहिलं आहे. डोळा खाली करत तिने याचा एक रिल व्हिडिओ देखील बनवला आहे.