भाजपाला धक्का! हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; कार्यकर्ता मेळाव्यात केली घोषणा. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं आहे. कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी यासंदर्भात घोषणा केली. इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर पुढचा निर्णय शरद पवार घेतील, असंही ते म्हणाले.
आज आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे. आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की नाही घ्यायचा ? असे म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांकडून हो म्हणत घोषणा देण्यात आल्या. ‘गुरुवारी मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलं होतं. साडेबारा वाजता सिल्वर ओपन बैठक झाली. शरद पवार यांनी मला सांगितलं तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बाकीची जबाबदारी माझी राहील, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.’
1995 मध्ये तालुक्यातील जनतेने आणि कार्यकर्त्यांनीच आग्रह धरला म्हणून आपण बंडखोरी करू अपक्ष निवडणूक लढवली. त्यानंतर पुन्हा जनतेनेच आग्राह धरला म्हणून आपण काँग्रेसमध्ये गेलो. त्यानंतर 2019 मध्ये तुम्हीच आग्रह धरला म्हणून आपण भाजपमध्ये गेलो, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. पवार साहेबांचं कुटुंब आणि आपलं कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे व्यक्तिगत संबंध सहा दशकांचे आहेत, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.