लग्न समारंभाचा हंगाम सुरू झालाय. विवाह सोहळ्यातील धमाल मज्जा मस्तीचे रील सोशल मीडियावर खूप व्हायरल होऊ लागलेत. कधी नवरी मुलगी डान्स करताना स्टेजवर येते. तर कधी नवरदेव मुलाचे मित्र काही तरी फ्रॉक करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आज असाच एका लग्न सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नवदाम्पत्याच्या वागणुकीवर नेटकरी भडकलेत.
नवरदेव नवरीचा व्हिडिओ पाहून नेटकरी टीकात्मक प्रतिक्रिया करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपात विधी सुरू असल्याचे दिसत आहे. वधू-वरांचे कुटुंबीय आणि नातेवाईक मंडपात बसलेले दिसतात. वर आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. अशात नववधू असे काही करते ज्यामुळे वराला लाजू लागतो. वर वधूला मंगळसूत्र घालताना तिच्याकडे सरकतो, त्यावेळी वधू वराच्या गालावर चुंबन घेते. हे पाहून मंडपातील सर्व कुटुंबातील लोकांना हसू येतं. परंतु वराला लाज वाटू लागते आणि तो शरमने मान खाली करत खाली पाहतो.