लग्नात नव्या नवरीचा डान्स, गंमतीदार उखाणा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण एका नवरीचा हटके आणि खतरनाक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ही नववधू बाइकवर स्टंटबाजी करताना दिसतेय. तिनं जागेवरच बाइक गरागरा फिरवली. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे गरागरा न फिरतील तरच नवल!
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात कधी लग्नातले गंमतीदार किस्से असतात, तर कधी लग्नातील हाणामाऱ्यांसारख्या भयानक प्रसंगांचे व्हिडिओ व्हायरल होतात. कधी नाचण्यावरून वर आणि वधूकडची मंडळी आपापसांत भिडतात, तर कधी गुलाबजाम, चिकन किंवा मानपान न केल्यावरून हाणामाऱ्या होतात आणि हेच व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. आता नवरी म्हटलं की, लाजाळू असते. पण सध्या एका ‘बिनधास्त’ नववधूचा व्हिडिओ इंटरनेटच्या विश्वास तुफान धुमाकूळ घालतोय. ही नववधू बाइक स्टंट करत आहे. तिचा ‘स्किल’ बघून सर्वच चक्रावून गेले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नववधूचा लूक ‘सॉलिड’ दिसतोय. नव्या नवरीनं लाल रंगाचा घाघरा परिधान केला आहे. तरीही बाइक स्टंट करताना कुठेही अवघडल्यासारखी दिसत नाही. बाइक स्टार्ट केली त्यावेळी कॉन्फिडन्स जबरदस्त असल्याचं दिसतं. डोळ्यांची पापणी लवण्याआधीच तिनं जागेवरच बाइक गर्रकन फिरवली
लग्नात नव्या नववधूचा बाइकवर स्टंटबाजी, धडकी भरवणारा हा व्हिडिओ
- Advertisement -