सोशल मीडियावर अनेक उखाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक उखाण्याचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी भन्नाट उखाणा घेताना दिसतेय. तिचा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कोणताही शुभ प्रसंग असो की लग्नसमारंभ विवाहित जोडपं आवर्जून उखाणा घेताना दिसतात. नवरा किंवा बायको लयबद्ध पत्नीने जोडीदाराचं नाव घेऊन उखाणा घेतात. पूर्वी फक्त महिलाच त्यांच्या पतीसाठी उखाणा घ्यायची पण आता पुरष मंडळी सुद्धा तितक्याच आवडीने उखाणा घेतात. कोणी उखाणा घेताना प्रेम व्यक्त करताना दिसतात तर कोणी उखाणा घेताना त्यांची लव्ह स्टोरी सांगताना दिसतात. खरं तर उखाण्याद्वारे अनेक जण आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. ही नवरी सुद्धा असाच उखाणा घेत मनातील भावना बोलून दाखवते.
Video : पत्नीने घेतला भन्नाट उखाणा… नवरीचा हा जोरदार उखाणा ऐकून थक्क व्हाल
- Advertisement -