सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, सोशल मीडियावर लग्नातील अनेक मजेशीर किस्से, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; ज्यात वधू तिच्या वराला फटके मारताना दिसत आहे.
लग्नातील प्रत्येक प्रथा वधू-वरासाठी खूप खास आणि वधू-वराच्या आठवणीत राहणारी असते. यातील काही प्रथांमध्ये वर आणि वधूमध्ये भांडणं देखील पाहायला मिळते. लग्नात नवऱ्याचा बूट चोरताना किंवा हार घालतेवेळी नेहमीच वधू-वराची भावंडं आणि मित्र-मैत्रिणींकडून गोंधळ केला जातो. या प्रकारचे मजेशीर चेष्टेचे वातावरण हल्ली अनेक लग्नांत पाहायला मिळते, अनेकदा या गोंधळामुळे लग्न लावणारे गुरुजीदेखील वैतागतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.
https://www.instagram.com/reel/C7g9BZuo1P7/?utm_source=ig_web_copy_link