Saturday, December 9, 2023

नवरदेवाने वाजवला ढोल, नवरीने केला भन्नाट डान्स….. Video

भारतातील विवाहसोहळा हा भव्यतेसाठी ओळखला जातो. अनेकदा भव्य कार्यक्रमांना विविध गोष्टींची जोड असते. वधू आणि वर दोघांची कुटुंबे एकत्र येतात. अलीकडच्या काळात, काही विवाहांनी भव्यतेमुळेच लोकप्रियता मिळवली आहे. अशाच एका डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि खळबळ उडवून दिली आहे. या लग्नात वधू-वर अतिशय सुंदर दिसत होते. व्हिडिओमध्ये एक आनंदाचा क्षण दर्शविला गेला असून त्यात वधूने डान्सच्या वेळी जे केलं ते साऱ्यांनाच आवडणारं ठरलं.

वधूने तिच्या इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ही इमोशनल गोष्ट तुमच्या हृदयात साठवून ठेवा.” व्हिडिओमध्ये वधू सुचिता मुखर्जी दिसत आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 135K फॉलोअर्स आहेत. ती लेहंगा आणि दागिन्यांनी सजलेली होती आणि स्मितहास्य करत बसली होती. त्याच्या मित्रांनी त्याला घेरले, त्यातील काही लोक “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” या लोकप्रिय चित्रपटातील “मेहंदी लगा के रखना” गाण्यावर नाचत होते. त्यावेळी वराला इम्प्रेस करण्यासाठी वधू स्वत: उठली आणि तिने वरासोबत डान्स केला. विशेष म्हणजे, नवरदेवाने ढोल वाजवला असताना, वधूने ढोलवर बसून डान्सही केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d