एका लग्नाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नवरी चक्क मंडपातच डाराडूर झोपताना दिसत आहे. एकीकडे भटजीचा मंत्रोच्चार सुरू आणि दुसरीकडे नवरीचं घोरणं सुरू असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.राजस्थानातील एका लग्नाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी हवन जवळ बसलेली दिसत आहे. पूजा सुरू असून लग्नविधी सुरू असल्याचं दिसत आहे. नवरदेव शांतपणे सर्व विधी ऐकत आहे. तर पदर ओढून बसलेली नवरीही विधी ऐकत असल्याच्या अविर्भावात बसलेली दिसत आहे. पण नवरी विधी ऐकत नसून डाराडूर झोपल्याचं लक्षात आल्यानंतर नवरदेव नवरीला खुणावतो. तेव्हा नवरी भांबावल्यासारखी जागी होताना या व्हिडीओत दिसत आहे. मात्र, नवरी झोपल्याचं पाहून नवरदेव संताप करण्याऐवजी मिश्किल हसताना दिसत आहे.
मंत्रोच्चार सुरु असताना नवरीची लागली तंद्री…नंतर झाली कावरीबावरी..
- Advertisement -