BSNL आपल्या ग्राहकांसाठी मोफत डेटा देत आहे. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या सर्व खासगी कंपन्यांनी आपल्या सर्व प्लॅनच्या किंमती महाग केल्या आहेत. तर दुसरीकडे बीएसएनएल आपल्या युजर्ससाठी मोफत डेटा वितरित करत आहे. बीएसएनएल या महिन्यात आपला 25 वा स्थापना दिन साजरा करत आहे. कंपनीच्या सेवेला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांना 24GB मोफत 4G डेटा देत आहे. बीएसएनएल ग्राहकांना 24GB अतिरिक्त डेटा घ्यायचा असेल तर त्यांना 500 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या प्लॅनसह रिचार्ज करावे लागेल. हे रिचार्ज बीएसएनएलच्या युजर्सने 1 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान करावे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 5GB डेटा मिळतो. प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळतात. विशेष म्हणजे प्लॅनमध्ये रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अनलिमिटेड फ्री डेटाही दिला जातो.
- Advertisement -