BSNL चा हा रिचार्ज प्लॅन 2,399 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकाला 395 दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये देशभरातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 एसएमएस आणि दररोज 2GB हायस्पीड डेटाचा लाभ मिळतो. विशेष म्हणजे, डेटा संपल्यानंतर तुम्ही 40kbps च्या वेगाने अमर्यादित इंटरनेट वापरू शकता.
BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री नॅशनल रोमिंगचाही लाभ मिळतो. यामध्ये 30 दिवसांसाठी मोफत BSNL Tunes चाही लाभ मिळतो. इतकंच नाही, तर हार्डी गेम्स, चॅलेंजर एरिना गेम्स, गेमऑन, ॲस्ट्रोटेल, गेमियम, झिंग म्युझिक, डब्ल्यूडब्ल्यूए एंटरटेनमेंट, लिस्टन पॉडोकॅट यांसारख्या सेवा मिळतात.
4G सेवा लवकरच सुरू होणार आहे
BSNL लवकरच देशभरात 4G सेवा सुरू करणार आहे. ऑक्टोबरमध्ये संपूर्ण देशात कंपनीची 4G सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.