अजित पवार राज्य सरकारमध्ये होऊन आता अडीच महिने उलटून गेले आहेत. सरकारकडे बहुमत असतानाही अजित पवार यांना सरकारमध्ये का घेतले?, त्यांना सोबत घेण्याचा निर्णय कुणाचा होता?, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. या प्रश्नांचं उत्तर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटाचे बुलढाणा जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक खोतकर यांनी आज लोणार बाजार समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी या राजकारणाचा मोठा खुलासा केला.
ते पुढे म्हणाले, अनैसर्गिक महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत युती केली. मात्र, भाजपने गरज म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतले. या निर्णयाचा आणि शिवसेनेचा काहीच संबंध नाही, असे खोतकर म्हणाले.