शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष केलं. “डॉ.राजेंद्र शिंगणे यांना आता मंत्रिपद मिळाले आणि त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले तर तुम्हाला ते मान्य असेल का?” असा प्रश्न गायकवाड यांना विचारण्यात आला होता, त्याला गायकवाडांनी विरोध केला.
राष्ट्रवादीला पालकमंत्री नको, अशी भूमिका गायकवाड यांनी घेतल्यामुळे नवा वाद होण्याची चिन्हे आहेत. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री झाल्याने अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत.
त्यांनी “काही झाले तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री होऊ देणार नाही” अशी भूमिका स्पष्ट केली आहे.