Tuesday, May 13, 2025

महायुतीचा ‘हा’ उमेदवार पडणारच… माजी मंत्र्याने लावली ९ लाखांची पैज…

लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील निकालात महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव होणार यावर पैज लावण्यात आली आहे. यासाठी 3.15 लाख रुपयांची पैज असून पैज जिंकल्यावर पैज लावणाऱ्यास तब्बल 9.45 लाख रुपये मिळणार आहे. राज्याचे माजी महसूलमंत्री तथा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री सुबोध सावजी यांनी ही पैज लावली आहे.

पैज लावल्यानंतर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी ती माध्यमांवर जाहीर सुद्धा करून टाकली. बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव झाल्यास माजी मंत्री सावजी यांनी लावलेल्या पैज प्रमाणे 9 लाख 45 हजार रुपये रोख मिळणार आहेत. प्रतापराव जाधव हे निवडून आले तर सावजींना 3 लाख 15 हजार रुपये रोख रक्कम आपल्या मित्राला लावलेल्या पैजनुसार द्यावे लागणार आहे. आता ही पैज बुलढाण्यात चांगलीच चर्चेत आली आहे. आता बुलढाण्याच्या निवडणुकीत महायुतीचे प्रतापराव जाधव बाजी मारणार की महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर विजयी गुलाल उधळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles