जोधपूर आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या नॅशलन हायवेवर एक चोटिला नावाचं गाव आहे. या गावात हे बुलेट बाबाचं मंदिर आहे. या मंदिरात ‘रॉयल एनफील्ड’ या बाईकची पूजा केली जाते. या बाईकचा नंबर RNJ 7773 असा आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बाईकमध्ये एक प्रकारची शक्ति आहे. त्यामुळे या भागातून जाणारे प्रवासी बुलेट बाबाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. काही जण तर नवस देखील मागतात.
https://x.com/aditya_kondawar/status/1737109578612130149?s=20 गोष्ट १९८८ सालची आहे. ओम सिंह राठोड नावाचा एक तरुण या बाईकनं प्रवास करत होता. दरम्यान अपघातात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या अपघाताचा तपास करण्यासाठी बाईक ताब्यात घेतली. पण आश्चर्याची बाब म्हणजे रात्री ही बाईक पोलीस स्टेशनमधून गायब झाली. अन् दुसऱ्या दिवशी ती घटनास्थळी सापडली. बरं, पोलिसांनी पुन्हा एकदा बाईक पोलीस स्टेशनमध्ये नेली. मात्र पुन्हा एकदा तोच प्रकार घडला. तेव्हा पासून या बाईकमध्ये शक्ति आहे अशी गावकऱ्यांची मान्यता झाली. बरं, ही बाईक घटनास्थळी कोणी नेली? याबाबत पोलिसांना कुठलीही माहिती मिळाली नाही. लोक असं म्हणतात, ओम सिंह राठोडचा आत्मा या बाईकमध्ये आहे. अन् तो येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची रक्षा करतो. त्यामुळे प्रवासी या बुलेट बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात गर्दी करतात.