अहमदनगर -शेवगांव व पाथर्डी परिसरामध्ये घरफोडी करणारी टोळी 6,63,500/- रुपये किमतीच्या 94.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिण्यासह स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.
प्रसकाळी त्यांचे घराचा दरवाजा बंद करुन शेतामध्ये शेतकामासाठी गेले असता कोणीतरी अनोळखी आरोपींनी त्यांचे घराचे कुलुप तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील पत्र्याचे पेटीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 1,92,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेलेला होता. सदर घटनेबाबत शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 566/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(a), 331 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी वरील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत तसेच अहमदनगर जिल्ह्यामधील मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणुन आरोपी अटक करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशान्वये पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भाऊसाहेब गोविंद काळे, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, अमोल कोतकर, भाऊसाहेब राजु काळे, बाळासाहेब खेडकर, संतोष खैरे, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांचे पथक तयार करुन मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेकामी पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
वरील पोलीस पथकाने अहमदनगर जिल्ह्यामधील यापुर्वी घरफोडीचे गुन्ह्यातील निष्पन्न झालेल्या आरोपींची माहिती संकलित करुन त्यांचे सध्याचे हालचालीची माहिती काढत असतांना दिनांक 08/07/2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा लखन विजय काळे रा. शेवगांव, ता. शेवगांव व त्याचे इतर साथीदारांनी केला असुन तो गुन्ह्यातील चोरीचे सोने एका मध्यस्थीमार्फत विकण्यासाठी सरकारी दवाखान्याजवळ, शेवगांव येथे येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पथकाने शेवगांव ते गेवराई जाणारे रोडवरील सरकारी दवाखान्याजवळ, शेवगांव, ता. शेवगांव येथे जावुन सापळा रचुन थांबले असता सरकारी दवाखान्याकडे 3 संशयीत इसम येतांना दिसले. पथकाने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) लखन विजय काळे वय 22 वर्षे, रा. शेवगांव, ता. शेवगांव, 2) गोरख हैनात भोसले वय 24 वर्षे, रा. घोसपुरी, ता. जि. अहमदनगर, 3) सोनाजी एकनाथ गर्जे, वय 52 वर्षे, रा. गर्जेवस्ती, गेवराई रोडे, शेवगांव, ता. शेवगांव असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेता इसम नामे सोनाजी एकनाथ गर्जे याचे कब्जामध्ये 6,63,500/- रुपये किमतीचे 94.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळुन आले आहे. सदर सोन्याचे दागिने व रोख रकमेबाबत त्याचेकडे विचारपुस करता त्याने सदरचे दागिने हे लखन विजय काळे व गोरख हैनात भोसले यांनी त्याचेकडे विकण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. लखन विजय काळे व गोरख हैनात भोसले यांनी सदरचे दागिने कोठुन आणले याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदरचे दागिने निवडुंगे, शिरसाठवाडी व जोगेवाडी, ता. पाथर्डी, चांदगांव व पिंगेवाडी, ता. शेवगांव तसेच शेवगांव शहरातुन घरफोडी चोरी करुन आणले असल्याचे सांगितले.
ताब्यातील आरोपींकडुन खालीलप्रमाणे एकुण 06 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.