Sunday, December 8, 2024

मंत्री असो किंवा नसो जिवाभावाच्या लोकांशी माझी बांधीलकी ;शिवाजीराव कर्डिले

नगर : विधानसभा निवडणुकीतील सहाव्या विजयानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा जनता दरबार पुन्हा सुरू झाला आहे. निकालानंतर मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी, सरकार स्थापनेच्या बैठका आटोपताच कर्डिले नगरला परतले असून आज बुधवारी बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी सकाळी सात वाजता त्यांचा जनता दरबार सुरू झाला आहे. तर ते आमदार झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांकडून सत्कार स्विकारतानाच अडचणी, प्रश्न घेऊन आलेल्यांना दिलासा देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. गेली दोन महिने निवडणुकीसाठी पायाला भिंगरी बांधून प्रचंड मेहनत घेतली असली तरी कुठल्याही प्रकारचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही.
राहुरी विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत कर्डिले यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. निकालानंतर लगेचच त्यांनी अतिशय विनम्रपणे आपल्या विजयाचे श्रेय त्यांच्यावर ३० वर्षापासून प्रेम करणाऱ्या जनतेला दिले. सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि प्रेम यामुळेच माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती सहाव्यांदा आमदार झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. निकाल घोषित झाल्यानंतर पक्षाच्या बैठका, नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी ते मुंबईला रवाना झाले. तिथले सगळे सोपस्कार पूर्ण करून ते लगेचच आपल्या माणसांत परत आले. आणि बुधवारी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील जनतेने रिघ लावली होती . एकीकडे सत्कार स्वीकारत असतानाच ते फोनाफोनी करून लोकांच्या समस्या सोडवत होते. भावी मंत्री म्हणून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पण मंत्री असू किंवा नसू माझे माझ्या जिवाभावाच्या लोकांशी असलेले नाते कधीच तुटणार नाही असा संदेश देत त्यांनी आपले रोजचे काम त्याच तडफेने सुरू केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles