पुणे – नगर महामार्ग हा अपघाताचा सापळा बनत चालला आहे. काही दिवसांपूर्वी अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आज सकाळी एक प्रवासी बस उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. रांजणगावजवळ एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. रांजणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. त्यातील १० जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिवाळीचा पहिला दिवस आणि हा अपघात घडल्याने गावी निघालेल्या नागरिकांवर संकट ओढवले आहे. ऐन सनासुदीला गावाकडे जाणाऱ्या नागरिकांवर दुर्दैवी वेळ आली आहे. जखमींमध्ये पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. रांजणगाव पोलिसांनी तातडीने मदतकार्य करण्यात येत आहे.






