व्हिडीओमध्ये एक बस कंडक्टर एका महिला प्रवासीच्या अंगावर हात उचलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही स्तब्ध व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
बंगळूर महानगर परिवहन मंडळाच्या बसमधील ही घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच मंगळवारी या बस कंडक्टरला महिला प्रवासीवर हात उचलल्यामुळे निलंबित करण्यात आले. हा व्हायरल व्हिडीओ सकाळच्या वेळीचा आहे. या व्हिडीओत दाखवलेली ही महिला बिलेकल्ली ते शिवाजीनगर असा प्रवास करत होती. कंडक्टर आणि महिलेमध्ये तिकिटावरून वाद झाला. त्यानंतर तुम्हाला व्हिडीओत दिसेल की व्हिडीओमध्ये महिला रडत रडत म्हणते, “कंडक्टरनी माझ्यावर हात कसा उचलला?” त्यावेळी इतर प्रवासी कंडक्टरला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण परिस्थिती आणखी बिघडते. कंडक्टर आणखी हिंसक होतो जेव्हा महिला त्याच्यावर हात उचलते. पुढे कंडक्टर सुद्धा महिलेला मारताना दिसतो. या घटनेनंतर महिलेने सिद्धपूर पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीची तक्रार दाखल केली.
Slap-Kalesh b/w a Woman and Conductor inside BMTC bus Bengaluru KA
pic.twitter.com/xBWlAxwsO3— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 27, 2024