व्हिडीओमध्ये तुम्ही एका प्रवाशानं बस कंडक्टरसोबत केलेली हाणामारी पाहू शकता. सुरूवातीला दोघांचे शाब्दिक वाद सुरू होते. पण अचानक दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली.बस प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे. तेवढ्यात बसचा कंडक्टर एका प्रवाशासमोर येऊन उभा राहातो आणि त्याच्याशी रागारागानं संभाषण करू लागतो. अर्थात कंडक्टरचं बोलणं ऐकून प्रवासी भडकतो आणि थेट कंडक्टरवर हल्ला करतो. मग थोडा वेळ दोघांची झटापट होते. दरम्यान प्रवासी कंडक्टरवर भारी पडू लागतो. पण तेवढ्यात बसमधील इतर प्रवासी मध्ये पडतात आणि त्या प्रवाशाला रोखतात. हे भांडण तिकिटावरून झालं असावं असा कयास लावला जात आहे.
चालत्या बसमध्ये प्रवासी आणि कंडक्टरमध्ये तुफान हाणामारी…व्हिडिओ
- Advertisement -