Saturday, January 18, 2025

अहमदनगर दौंड रस्त्यावर बस उलटून अपघात; दोघांचा मृत्यू चौघे जखमी

अहमदनगर-दुचाकीला धडक दिल्यानंतर खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर इतर चार ते पाच प्रवासी किरकोळ स्वरूपात जखमी झाले. अपघात नगर-दौंड रस्त्यावर नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद फाट्याजवळ काल, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.

अपघातातील मृतामध्ये बाबुर्डी घुमट गावातील भाऊसाहेब दगडू येवले व बस चालक या दोघांचा समावेश असल्याचे समजले. बस चालकाचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. बस (जीजे 05 बीयु 7717) दौंडहून नगरकडे येत होती व ती पुढे अहमदाबादला जाणार होती. बसमध्ये एकूण 10 ते 12 प्रवासी होते. बाबुर्डी बेंद फाट्याजवळ बसची प्रथम दुचाकीला (एमएच 16 बीडी 3458) धडक बसली.

त्यानंतर बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली गेली. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व 108 क्रमांकाची रूग्णवाहिकाही तेथे आली. त्यामधून जखमी व मृतांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. माहिती मिळतच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles