Monday, April 28, 2025

Gold- Price:बाजारापेक्षा स्वस्तात खरेदी करा सोने! सोमवारपासून सुरु होत आहे सेल…

सोन्यातील गुंतवणूक पण फायदेशीर ठरते. सोन्याची दागिने तयार करुन घरात ठेवण्यापेक्षा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ही योजना तुम्हाला मालामाल करु शकते. मोदी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा 2015 मध्ये सुरु केली होती. या योजनेचा 8 वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. त्यात ग्राहकांना जोरदार परतावा मिळाला आहे. केंद्र सरकार सोमवारी सोन्यात गुंतवणूक करण्याची खास संधी देत आहे. या योजनेत ग्राहकांना 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या भावाने सोन्यात गुंतवणूक करता येईल. या गुंतवणुकीवर जीएसटी वा कर लागत नाही. या योजनेत वार्षिक व्याज पण मिळते.

सोमवारपासून सॅव्हरिन गोल्ड बाँड योजनेत गुंतवणुकीची संधी मिळेल. भारतीय रिझर्व्ह बँक 18 डिसेंबरपासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची तिसरी मालिका सुरु करत आहे. त्याचे प्रति ग्रॅम दरपत्रक पण आले आहे. तर योजनेत डिजिटल पेमेंटद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 50 रुपये प्रति ग्रॅमची सवलत देण्यात येईल.देशातील अनेक सराफा बाजारात सोन्याचा भाव सध्या 64,000 रुपयांच्या जवळपास आहे. पण आरबीआयने ग्राहकांसाठी या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 6,199 रुपये प्रति ग्रॅमचा भाव ठेवला आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्यासाठी 62,000 रुपये मोजावे लागतील. डिजिटल पेमेंट केले तर गुंतवणूकदारांना 50 रुपये प्रति ग्रॅमची सवलत मिळेल. सोन्याचा भाव 6,149 रुपये प्रति ग्रॅम असेल. आरबीआयचा गोल्ड बाँड हा 24 कॅरेट सोन्याच्या किंमती इतका असतो.
नोव्हेंबर 2015 मध्ये गोल्ड बाँडमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यांना या 30 नोव्हेंबर रोजी जवळपास 2.28 लाख रुपयांचा परतावा मिळाला. 8 वर्षांत त्याला जवळपास 1.28 लाख रुपयांचा नफा झाला. विशेष म्हणजे ग्राहकाला सोने खरेदी करण्याचे वा ते सांभाळण्याची चिंता या योजनेत नाही. या मालिकेतील गोल्ड बाँडवर सप्टेंबर 2016 नंतर व्याजदर घटले आहे. ग्राहकाला पूर्वी 2.75 टक्क्यांनी व्याज मिळत होते. आता 2.5 टक्के दराने व्याज मिळाले. या योजनेने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles