Wednesday, April 17, 2024

शेतकऱ्यांना मिळालं गिफ्ट! २४ हजार कोटी रुपयांच्या खतांसाठी अनुदान मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. सरकारने खरीप हंगामासाठी खत अनुदान वाढवण्यास मंजुरी दिलीय. खरीप हंगामासाठी २४ हजार कोटी रुपयांचं खत अनुदान मंजूर करण्यात आलंय. तसेच आसाममध्ये टाटा कंपनीच्या पॅकेजिंग प्लांटलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. एनबीएस योजनेंतर्गत ३ नवीन खत ग्रेड समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आलीय. तर खरीप हंगाम, २०२४ (०१-०४-२०२४ ते ३०-०९-२०२४ पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅश (पी आणि के) खतांवर २४,४२० कोटी रुपयांचे पोषण-आधारित अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जगात युरिया खताच्या किमती वाढल्या आहेत, परंतु सरकारने याचे दर वाढवले नसल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी दिलीय.
NBS धोरणांतर्गत पोषक अनुदानाचे दर वार्षिक किंवा द्विवार्षिक आधारावर निर्धारित केले जातात. ज्याच्या आधारावर २५ P&K खतांसाठी अंदाजे अनुदानाची गणना केली जाते. आगामी खरीप २०२४ हंगामासाठी नायट्रोजनसाठी ४७.०२ रुपये प्रति किलो, स्फुरदासाठी २८.७२ रुपये प्रति किलो, पोटॅशसाठी २.३८ रुपये प्रति किलो आणि सल्फरसाठी १.८९ रुपये प्रति किलो अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles