Home ब्रेकिंग न्यूज महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार कधी? समोर आली मोठी अपडेट

महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार कधी? समोर आली मोठी अपडेट

0

सरकार स्थापन होऊन जवळपास एक आठवडा होत आला. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. परंतु, भाजप गृहखात शिवसेनेला देण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे विस्तार लांबल्याची चर्चा आहे.

याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा हा तिढा आज दिल्लीत सुटण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत.

महायुतीचे तिन्ही नेते आज दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. या नेत्यांसोबत ही सदिच्छा भेट असली तरी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. फक्त खाते वाटपासंदर्भात तोडगा निघाला नाही. शिवसेनेला १२ मंत्रीपदे तर भाजपला २० ते २२ मंत्रिपदे मिळणार आहे. राष्ट्रवादीला १० मंत्रिपदे दिले जाणार असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अडीच, अडीच वर्ष मंत्री असा फॉर्म्युला आणला आहे. अडीच वर्षानंतर नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे.